चंद्रपुर शहर महानगरपालिका आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचारी नियमित सेवेत




चंद्रपूर ,28 मार्च (का. प्र.) : महाराष्ट्र राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने युद्ध स्तरावर सम्पूर्ण शहरात फवारणी, धुरळणी, आवश्यक ठिकाणी जनतूनाशक पावडरचा छिडकाव सुरू केलेला आहे, बाजार,रेल स्टेशन,बस स्टँड, वर्दळीच्या ठिकाणी, पब्लिक कम्युनिटी टॉयलेट ,दवाखाने येथे फवारणी धुरळणी सुरू केलेली आहे


कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने पसरत असताना आता संपूर्ण देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली आहे, नागरिकांनी आपली काळजी स्वतः घ्यायची आहे, या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू साठी घराबाहेर पडा, परंतु गरज नसताना घराबाहेर निघू नये असा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. जनतेचे आरोग्य योग्य व सुदृढ रहावे म्हणून देशासाठी सेवा प्रदान करणारे मनपा कामगार अहोरात्र परिश्रम करून कार्य करीत आहे.
चंद्रपूर मनपा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात आहेत, शहरातील विविध ठिकाणी अँटी व्हायरल लिक्विड, ब्लिचिंग पावडर, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी सुरू केलेली आहे, स्वच्छतेच्या बाबतीत असो की आरोग्याच्या बाबतीत पालिका ही नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमी तत्पर असते.