महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांची नोंद , आता पर्यन्त एक दिवसाची (24 तासाचा) सर्वात मोठी संख्या #Maharashtra #Corona #Highest #Positive #Patient

महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांची नोंद 

आता पर्यन्त  एक दिवसाची  (24 तासाचा) सर्वात मोठी संख्या

मुंबई, 04 जुलाई : राज्यात आज कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख ८० हजार ९७५ नमुन्यांपैकी २ लाख ६४ नमुने पॉझिटिव्ह (१८.५१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९६ हजार  ३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-४, जळगाव-३, जळगाव मनपा-४, पुणे-१, पुणे मनपा-७, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-४, सोलापूर मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-३, लातूर मनपा-१, अकोला-२, अकोला मनपा-१, यवतमाळ-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.