विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस सह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु
नागपुर, 04 ऑक्टोबर : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे . अनलॉक पाचमध्ये (Unlock 5.0) राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे .
त्यानुसार रेल्वेखात्याने दसरा - दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे . 15 ऑक्टोबरपासून आरक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे .
गोंदिया- मुंबई ( सीएसटी ) विदर्भ व गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस यासह मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस , मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस , पुणे - नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस ,
अमरावती- सीएसटी ( अंबा एक्स्प्रेस )
या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उपयोगी ठरणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे . या गाड्यांसाठी 15 ऑक्टोबरपासून आरक्षण करता येणार आहे . मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या राज्यात अधिक आहे .
मार्च महिन्यापासून या गाड्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बंद झाल्याने अडचण निर्माण झाली होती . ती तब्बल सहा महिन्यानंतर पाचव्या अनलॉकमध्ये सुटली आहे . दसरा व दिवाळी या सणांच्या तोंडावर गाड्या सुरू होणार असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे .
या गाड्या सुरू होणार
मुंबई - नागपूर ( सेवाग्राम एक्स्प्रेस ) ,
मुंबई - गोंदिया ( विदर्भ एक्स्प्रेस ) ,
पुणे - नागपूर सुपर फास्ट ,
पुणे - नागपूर ( गरीबरथ एक्स्प्रेस ) ,
पुणे - भुसावळ ,
कोल्हापूर - गोंदिया ( महाराष्ट्र एक्स्प्रेस ) ,
मुंबई - पुणे ( डेक्कन एक्स्प्रेस ) ,
मुंबई - पुणे ( इंटर सिटी ) ,
मुंबई - पुणे ( सिंहगड ) ,
मुंबई - पुणे ( प्रगती एक्स्प्रेस ) ,
मुंबई - लातूर ,
मुंबई - सोलापूर ( सिद्धेश्वर एक्स्प्रेस ) ,
मुंबई - कोल्हापूर ( महालक्ष्मी एक्स्प्रेस ) ,
पुणे - सोलापूर ( हुतात्मा एक्स्प्रेस )
मुंबई - अमरावती एक्स्प्रेस
आदी गाड्या 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत .