चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 165 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू ,आतापर्यंत 16,434 बाधित झाले बरे, उपचार घेत असलेले बाधित 1,953 corona

चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 86 कोरोनामुक्त 

 165 नव्याने पॉझिटिव्ह ; 

2 मृत्यू

 आतापर्यंत 16,434 बाधित झाले बरे

उपचार घेत असलेले बाधित 1,953

चंद्रपूर, दि. 22 नोव्हेंबर: चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 86 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

 तर 165 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 669 वर पोहोचली आहे. 

तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 16 हजार 434 झाली आहे.

 सध्या एक हजार 953 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 40 हजार 92 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 16 हजार 440 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

आज मृत झालेल्या बाधितामध्ये विठ्ठल मंदिर वार्ड, वरोरा येथील 80 वर्षीय महिला व 

कोसारा चंद्रपूर येथील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 282 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 262, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.