जनतेचे मरण हेच महाविकास आघाडी सरकारचे धोरण – आ. सुधीर मुनगंटीवार, लॉकडाऊन दरम्‍यानची गोरगरीबांची विज बिले माफ करण्‍यासाठी भाजपाचे आंदोलन, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी केली बिज बिलांची होळी #SudhirMungantiwar

जनतेचे मरण हेच महाविकास आघाडी सरकारचे धोरण – आ. सुधीर मुनगंटीवार

लॉकडाऊन दरम्‍यानची गोरगरीबांची विज बिले माफ करण्‍यासाठी भाजपाचे आंदोलन

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी केली बिज बिलांची होळी
 
राज्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनदरम्‍यान गोरगरीबांना घराबाहेर पडू नका असे आवाहन करत सरकारमधील प्रत्‍येक मंत्री गरीबांना न्‍याय देण्‍याची भाषा करीत होते. न्‍याय देणे तर दुरच मात्र याच लॉकडाऊनच्‍या काळातील गरीबांची विज बिले माफ करण्‍याचे विस्‍मरण मात्र सरकारला झाले. या महाविकास आघाडी सरकारला विस्‍मरणाचा रोग अर्थात अल्‍झायमर झाला आहे. जनतेचे मरण हेच महाविकास आघाडी सरकारचे धोरण असल्‍याची प्रखर टिका माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दिनांक 23 नोव्‍हेंबर रोजी गांधी चौक चंद्रपूर येथे भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे आयोजित विज बिलाची होळी करण्‍याच्‍या आंदोलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. लॉकडाऊनच्‍या काळातील गरीबांची विज बिले माफ करण्‍याच्‍या मागणीसाठी भाजपातर्फे हे आंदोलन करण्‍यात आले. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, माजी महापौर तथा महिला आघाडी महानगर अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, सौ. वनिता कानडे, महानगर सरचिटणीस सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, वसंत देशमुख, सुरेश तालेवार, अरविंद कोवे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, राज्‍यात 1 कोटी 97 लाख 78 हजार 478 इतके घरगुती विज ग्राहक आहे. सरकारने श्रीमंत, व्‍यापारी, नोकरदार यांची विज बिले माफ करण्‍याची आमची मागणी नाही. जे हातावर पोट घेवून जगत आहेत अशा गरीबांची विज बिले माफ करा ही आमची मागणी आहे. ग्रामीण भागात 60 लक्ष 64 हजार 157 तर शहरातील झोपडपट्टी भाग मिळून 1 कोटी 38 लक्ष 41 हजार 907 इतके गरीब विज ग्राहक आहेत. या गरीबांना लॉकडाऊनच्‍या काळात आर्थिक हालअपेष्‍टा सहन कराव्‍या लागल्‍या. मात्र त्‍यांची विज बिले माफ करण्‍यासाठी या सरकारजवळ पैसा नाही. मंत्र्यांच्‍या बंगल्‍यांवर, दालनांवर खर्च करण्‍यासाठी सरकारजवळ पैसे आहे. नव्‍या गाडया घेण्‍यासाठी सरकारजवळ पैसे आहे. ठेकेदारांचे पैसे देण्‍यासाठी सरकारजवळ पैसे आहे.  मात्र गरीबांची विज बिले माफ करण्‍यासाठी सरकारजवळ पैसे नाही. लॉकडाऊनच्‍या काळातच मुंबईतील बिल्‍डरांना मुद्रांक शुल्‍कात सवलत देण्‍याचा ऐतिहासिक निर्णय राज्‍य सरकारने घेतला. बिल्‍डरांवर सरकारचे असलेले असीम प्रेम प्रदर्शित केले. एकीकडे जाहीरनाम्‍यात गरीबांना मोफत विज देवू अशी आश्‍वासने द्यायची व दुसरीकडे गरीबांच्‍या तोंडाला पाने पुसायची असे या सरकारचे धोरण असल्‍याची टिका आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केली.
1 एप्रिल 2020 रोजी या सरकारने विज दरवाढ जनतेवर लादली. गरीबांवर 40 पैसे युनिटने दरवाढ लादली. देशातली सर्वात महागडी विज महावितरणच्‍या माध्‍यमातुन देण्‍यात येत आहे. महावितरण कंपनी म्‍हणजे महाशोषण कंपनी झाल्‍याची टिका यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली. 23 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला आणि 1 एप्रिलला या सरकारने विज दरवाढ केली. आमच्‍या सरकारच्‍या काळात थकबाकी असल्‍याचे ऊर्जामंत्री सांगतात. दुष्‍काळी परिस्‍थीतीमुळे शेतक-यांना मदतीचा हात देण्‍यासाठी आमच्‍या सरकारने घेतलेल्‍या निर्णयामुळे ही थकबाकी झाली. मात्र आज राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या मालकीच्‍या साखर कारखान्‍यांकडे, पाणीपुरवठा विभाग, नगरविकास विभागाकडे मोठया प्रमाणावर थकबाकी आहे. त्‍याबाबत एक अक्षरही ऊर्जामंत्री काढत नाही. या संदर्भात सरकारने श्‍वेतपत्रिका काढण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. 

लॉकडाऊनच्‍या काळातील गोरगरीबांची विज बिल माफ न केल्‍यास भारतीय जनता पार्टी आंदोलन अधिक तिव्र करेल, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
 
यावेळी राजेंद्र गांधी, महापौर राखी कंचर्लावार, माजी महापौर अंजली घोटेकर यांनी सुध्‍दा आपल्‍या भाषणातून राज्‍य सरकारच्‍या दडपशाहीचा निषेध केला. आंदोलनाचे संचालन महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी विज बिलांची होळी करत राज्‍य सरकारच्‍या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 

आंदोलनात प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, राकेश बोमनवार, सुर्यकांत कुचनवार, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, रामकुमार आकापेल्‍लीवार, यश बांगडे, कुणाल गुंडावार, राजेश कोमल्‍ला, प्रज्ञा गंधेवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, कल्‍पना गिरडकर, उषा मेश्राम, आशिष ताजणे, बंडू गौरकार, धनराज कोवे, विनोद शेरकी, आकाश मस्‍के, प्रा. मोहम्‍मद जिलानी, राणी कोसे, पुरूषोत्‍तम सहारे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.