सामाजिक दायित्वाच्या भानातून तिवारी परिवारातील 'सानिका' चे अनमोल कार्य ! #सामाजिककार्य #SanikaTiwari

सामाजिक दायित्वाच्या भानातून तिवारी परिवारातील 'सानिका' चे अनमोल कार्य !

सध्या कोरोना महामारीच्या काळात सगळे वेगळ्याचं ताण-तणावात आयुष्य कंठीत आहेत, लहान मुले ही यातून बचावलेली नाहीत. 'घरीचं रहा, सुरक्षित रहा' याची अंमलबजावणी ही लहानगे करीत आहेत, परंतु त्यांच्या हातून कधी-कधी होणारे अनमोल कार्य हे मोठ्यांना ही बरेच काही सांगून जाते. तिवारी परिवारातील 'सानिका' च्या हाताने सुद्धा सामाजिक दायित्वाची जाणिव करून देणारा असाचं एक प्रसंग घडला. 

विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील सुनिल तिवारी यांची ज्येष्ठ कन्या 'सानिका' हिचा २ नोव्हेंबर हा जन्मदिन ! घरातचं राहुन जन्मदिन साजरा करण्याचा आजी, आई-बाबा यांचा मानस होता. परंतु 'सानिका' च्या मनात याबद्दल काही वेगळे सुरू होते. ग्रामीण भागातून एक महिला झाडीतील सुखा-मेवा समजल्या जाणारे 'शिंगाडे' विकायला येत असे. सुनिल तिवारी यांचे वडील स्व. श्रीनिवासजी तिवारी (त्या काळातील निर्भिड पत्रकार) हे त्या शिंगाडे विकणाऱ्या महिलेकडून हमखास शिंगाडे घ्यायचे, तो त्यांचा त्यावेळेसचा नित्यक्रम होता. शिंगाडे विक्रेती महिला ही नित्याचेचं 'ग्राहक' म्हणून शिंगाडे देऊनचं जायची. लहानपणी हे बघणारे सुनिल तिवारी व त्यांच्या मातोश्रीनी श्रीनिवासजी तिवारी यांच्या मृत्यूपश्चात हा नित्यक्रम सुरू ठेवला. आजही ती शिंगाडे विक्रेती घरी येऊन अधिकाराने 'शिंगाडे' विक्री करूनचं जायची. सुनिल तिवारी यांची कन्या 'सानिका' ही बाब नित्यक्रमाने बघत आली. 

आपल्या जन्मदिनी या शिंगाडे विक्रेत्या आजीला काही तरी द्यायचे असे तिने निश्चित केले, परंतु ही बाब घरच्यांकडून लपवून ठेवायची असा निर्धार बहुतेक 'सानिका' ने केला असेल. आपल्या जमविलेल्या पैश्यातून (पॉकेट मनी) तिने नविन साडी-लुगडे, पॅक केलेली पाण्याची बॉटल व काही नगद राशी आजीला घरामध्ये बोलावून सन्मानाने आपल्या जन्मदिनी भेट म्हणून दिली, 'सानिका' च्या या सन्मानाने त्या आजी तर भारावल्याचं, घरातील सदस्यांना ही सुखद धक्का बसला. रक्ताच्या नात्याने आज ची पिढी दरावत चालली आहे, असे म्हणतात. अशा वेळी लहानग्या 'सानिका' ने सामाजिक भानाचे उदाहरण सादर केले, बहुतेक ही बाब रक्तातूनच येत असते, असे म्हणायला हरकत नाही. स्व. श्रीनिवासजी तिवारी यांचा दिलदारपणा व निर्भीड वृत्तीबद्दल त्यांच्या काळातील पिढी आवर्जून सांगत असते. ज्येष्ठ पत्रकार, साप्ता. चंद्रपूर की बुलंद आवाज चे संपादक, महारक्तदाते सत्यनारायणजी तिवारी हे 'सानिका'चे आजोबा, आपल्या रक्तदानाच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी चंद्रपूरचे नांव मोठे केले आहे. 'सानिका' चे वडील साप्ता:चंद्रपूर एक्सप्रेस चे संपादक सुनील तिवारी हे मागील काही वर्षापासून आपल्या दुचाकीवर 'पाण्याची कॅन' बांधून व ती रस्त्यावर कुठे ही थांबवून तहानलेल्यांना 'पाणी' पाजण्याचे अभिनव असे कार्य करीत आहेत. सामाजिक दायित्वाचे भान हे रक्तातचं असावे लागते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. या समाजाचे 'आपण ही काही देणे लागतो' ही जाण लहानग्या 'सानिका' ने तिच्या जन्मदिनी करून दिली. मोठ्यांना आज यातून काही शिकण्याची खरी गरज आहे.