चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 172 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू corona Chandrapur

चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 172 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू

गत 24 तासात 169 कोरोनामुक्त 

 आतापर्यंत 18,235 बाधित झाले बरे

 उपचार घेत असलेले बाधित 1,910

चंद्रपूर, दि. 3 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 169 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 172 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 455 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 235 झाली आहे. सध्या एक हजार 910 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 53 हजार 009 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 30 हजार 281 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 
आज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा तालुक्यातील मदेली येथील 69 वर्षीय महिला व चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 310 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 287, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 172 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 45, चंद्रपूर तालुक्यातील 12, बल्लारपुर तालुक्यातील पाच, भद्रावती 17, ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, सिंदेवाही आठ, मुल 17, सावली तीन, गोंडपीपरी सहा, राजुरा पाच, चिमुर पाच, वरोरा 16, कोरपना 25, जिवती एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.