82 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू
आतापर्यंत 20,924 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 671
चंद्रपूर, दि. 22 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 92 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 82 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 951 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 924 झाली आहे.
सध्या 671 बाधितांवर उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 65 हजार 755 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 41 हजार 701 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये राजोरी ता. मुल येथील 80 वर्षीय पुरूष,
चिमूर पडाळा येथील 75 वर्षीय पुरूष व
करमवीर वार्ड ता. वरोरा येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 356 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 329, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 82 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 11,
चंद्रपूर तालुक्यातील 12,
बल्लारपुर आठ,
भद्रावती 12,
ब्रम्हपुरी तीन,
मूल नऊ,
गोंडपिपरी दोन,
राजूरा दोन,
चिमुर आठ,
वरोरा नऊ व
इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.