COVID-19 NEWS: चिंता वाढली! आज महाराष्ट्र राज्यात नवे रुग्ण सापडले #CoronaMaharashtra

Corona News: चिंता वाढली! आज महाराष्ट्र राज्यात 13,659 नवे रुग्ण सापडले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनीही मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, असा सूचना सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत. परंतु राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. राज्यात आज 13,659 नवे कोरोना रुग्ण सापडले आहे, त्यामुळे नागरिकांची चिंताही वाढलीय. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंत एकूण संख्या 22,52,057 झालीय. 

राज्यात आज 9,913 रुग्ण बरे होऊन घरी परतले
सध्या राज्यात 99,008 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 9,913 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत एकूण 20,99,207 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.21% एवढे झालेय. आज राज्यात 13,659 नवीन रुग्णांचे निदान झालेय. राज्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीय.

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.34 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,71,15,534 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 22,52,057 (13.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 4,71,187 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4,244 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.