15 मार्च ते 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध
नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.
आम्हाला आता कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल. मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील, असं नितीन राऊत म्हणाले.
नागपूरमध्ये काय सुरु काय बंद?
मद्य विक्री बंद
डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरु
लसीकरण सुरु राहणार
खासगी कंपन्या बंद, सरकार कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार