पूर्व वित्तमंत्री , आमदार सुधीर मुनगंटीवारांना कोरोना लसीचा पहिला डोस, गैरसमज काढून टाका, मुनगंटीवारांचे आवाहन #Vaccination #SudhirMungantiwar

पूर्व वित्तमंत्री , आमदार सुधीर मुनगंटीवारांना कोरोना लसीचा पहिला डोस

गैरसमज काढून टाका, मुनगंटीवारांचे आवाहन

चंद्रपूर ,12 मार्च : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मुनगंटीवारांनी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला. दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली. तसेच याआधी राज्यातील अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. मुनगंटीवारासह त्यांच्या पत्नीनेही कोरोना लस घेतली आहे.
 मुनगंटीवारांचा आवाहन 
राज्यातील कोरोना लसीकरण मोहीम आता वेगवान झाली आहे. त्यामुळे या लसीविषयक गैरसमज काढून टाका, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नागरिकांनी लसीकरण मोहीमेत सहभागी होत लस टोचुन घ्‍यावी, असे माझे नम्र आवाहन आहे.