विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ४० वी वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न The 40th annual general meeting of Vidarbha Irrigation Employees Cooperative Credit Society concluded with enthusiasm.

विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ४० वी वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न

#Loktantra Ki Awaaz 
नागपूर : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था, नागपूरची ४० वी वार्षिक आमसभा महात्मा ज्योतिबा फुले सभागृह, नागपूर येथे दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी पतसंस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुशरंग नागफासे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग अनिल बहादूरे तसेच सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता किशोरजी वरंभे उपस्थित होते.

यावेळी पतसंस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कहले, सहसचिव सुरेशगिर रिधनार्थी, कोषाध्यक्ष मेघा करारे, पालक संचालक गणेश गेडेकर (चंद्रपूर), अविनाश हर्षे (नागपूर), माधव वडनेरकर (भंडारा), चंद्रशेखर चाफले (वर्धा) तसेच संचालक शाम वैद्य, सतीश भोयर, मोनिका कायरकर, राजेंद्र देशमुख, मुकेश खराबे, विजित थूल, संजय खोंडे, नितीन सोमकूवर, वंदना चौरागडे आणि सरव्यवस्थापक विशाल भोतमांगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आमसभेचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या कोषाध्यक्ष मेघा करारे यांनी केले. पतसंस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा तसेच भविष्यातील नियोजनाबाबत सहसचिव सुरेशगिर रिधनार्थी यांनी प्रकाश टाकला.

यावेळी सभासदांनी विविध विषयांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीने उत्तरे देण्यात आली. प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले. तसेच पतसंस्थेच्या विविध योजनांना सभागृहाने मंजुरी प्रदान केली.

या वार्षिक आमसभेला नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांतील बहुसंख्य सभासदांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शितल पाटील, नंदू बोंदरे, मंगेश इंगोले, मनोज ब्रह्मे तसेच पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व सभासदांनी परिश्रम घेतले.

The 40th annual general meeting of Vidarbha Irrigation Employees Cooperative Credit Society concluded with enthusiasm.

#The40thannualgeneralmeeting  #VidarbhaIrrigation 
#EmployeesCooperativeCreditSocietyconcludedwithenthusiasm