पाच शैक्षणिक पदव्या व तीन SWAYAM अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल अमोल आंधळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद, “IBR Achiever” म्हणून गौरव; शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी Amol Andhale enters India Book of Records for completing five academic degrees and three SWAYAM coursesHonored as “IBR Achiever”; Remarkable achievements in the field of education

पाच शैक्षणिक पदव्या व तीन SWAYAM अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल अमोल आंधळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

“IBR Achiever” म्हणून गौरव; शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

#Loktantra Ki Awaaz

लोणार : शिक्षणाच्या माध्यमातून सातत्याने ज्ञानार्जनाची वाटचाल करत विविध शैक्षणिक पदव्या, पदविका तसेच ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारे तालुक्यातील गोत्रा गावचे सुपुत्र अमोल सखाराम आंधळे यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीची दखल India Book of Records ने घेतली असून, त्यांना “IBR Achiever” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

अमोल आंधळे यांनी शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती करत Bachelor of Commerce (B.Com), Master of Commerce (M.Com), Master of Business Administration (MBA), School Management मधील Post Graduate Diploma तसेच Mass Communication and Journalism मधील Diploma अशा विविध क्षेत्रांतील पाच शैक्षणिक पदव्या व पदविका पूर्ण केल्या आहेत.

यासोबतच आधुनिक ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातूनही त्यांनी आपली ज्ञानसाधना सुरू ठेवली आहे. त्यांनी भारत सरकारच्या SWAYAM या ऑनलाइन शिक्षण व्यासपीठावर उपलब्ध असलेले Business Communication, Advanced Topics in Organisational Behaviour आणि Understanding Organisational Behaviour हे तीन ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.

त्यांच्या या बहुआयामी आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रवासाची दखल घेत India Book of Records ने दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या नावाची नोंद केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अमोल आंधळे यांना IBR Achiever Certificate, Medal तसेच इतर सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

अमोल आंधळे हे केवळ स्वतःच्या शिक्षणापुरते मर्यादित न राहता समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही कार्यरत आहेत. सध्या ते शैक्षणिक मार्गदर्शन तसेच ‘परीक्षित अभ्यास’ या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब, अनाथ, दिव्यांग व निराधार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक सहकार्य करण्याचे कार्य करीत आहेत.

शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली आहे. विविध विषयांमध्ये उच्च शिक्षण घेऊन सातत्याने ज्ञान संपादन करण्याच्या त्यांच्या जिद्दीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल संबंधित दोन्ही विद्यापीठांकडूनही त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे. तसेच गोत्रा गावासह लोणार तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व नागरिकांकडून अमोल आंधळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सातत्य, जिद्द आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर प्राप्त केलेल्या या यशामुळे अमोल सखाराम आंधळे यांनी परिसरातील युवक व विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Amol Andhale enters India Book of Records for completing five academic degrees and three SWAYAM courses

Honored as “IBR Achiever”; Remarkable achievements in the field of education