करोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा : डॉ मिलिंद माने

 चंद्रपूर , 19 मार्च :-  करोना व्हायरसचा कुप्रभाव जगभरात दिसून येत असून त्याचा प्रभाव येथील जनसामन्यावर पडू नये म्हणून भारत सरकार आणि राज्यसरकार अतिशय काटेकोर आणि शास्त्रशुद्ध प्रणाली अंगीकारत असून यासाठी जनतेनेही समंजसपणा व सहकार्य  देण्याची गरज आहे असे मत नागपूरचे माजी आमदार तथा बालरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद माने यांनी व्यक्त केले ते विकलांग सेवा संस्था कार्यालयातील सदिच्छा भेटीत मौलिक मार्गदर्शन केले.
  ते पुढे असेही म्हणाले की करोनाचा प्रभाव फक्त वृद्ध, एडस बाधित रुग्ण तसेच शुगर व तत्सम आजार असणाऱ्यावर पडणार असून यासाठी नागरिकांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची गरज असून स्वच्छतेवर अधिक भर देण्यासाठी जागरूक असावे तसेच गर्दीत सहभागी न होता   आपल्याच घरात करोना प्रभाव संपेपर्यंत कुटुंबियांसोबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास करोनावर नियंत्रण येऊ शकेल.
 डॉ मिलिंद माने नागपूरचे माजी आमदार असून सामाजिक व  सिकलसेल,एडस व चिकन गुणियावर त्यांनी आपला मौलिक सहभाग दिलेला आहे.
याप्रसंगी  प्रा.रुकैय्या शेख, संगीता चव्हाण, टायपिंग प्राचार्य संगीता ठोसरे,अंगणवाडी शिक्षिका नंदा बिहाडे ,प्रसाद पान्हेरकर ,पूजा राखोंडे, अशोक खाडे तसेच संस्था सचिव श्री देवराव कोंडेकर ,खुशाल ठलाल,पत्रकार राहुल पेंढारकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.