तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

मुंबई 11 मार्च : गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे.
देशातील तरूण मोठ्या प्रमाणात भारतीय सेनेत दाखल झाल्याचे चित्र आहे. भारतीय सेनेत गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध रिक्त पदांच्या सैन्य भरतीमध्ये 30 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील तसेच नेपाळमधील  सरासरी 95 टक्के  तरूण दाखल झाले आहेत. यात एकट्या महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा समावेश आहे.