महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण : मुख्यमंत्री


मुंबई, 12 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 8 पुणे येथे तर दोघांना मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आली नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सतर्कता बाळगावी, असे आवाहन करतानाच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन क्षेत्रीय स्तरावर असावे यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विना प्रेक्षक आयपीएल सामन्यांसंदर्भात कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येथे पत्रकारपरिषदेत दिली.