महाराष्ट्रात बंदी चा आदेश अधिसूचनेनुसार अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना बंदीतुन सूट

मुंबई , 25  मार्च (का. प्र.) :  कोरोना चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात बंदी आदेश. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना पुढील निर्बंधातून सूट.

👇बंदी आदेशातून सूट👇

➡किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये

➡किमान मनुष्यबळासह बॅंका/एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लिअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) व अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या 

➡मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे

➡टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा

➡अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक

➡शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात

➡मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे

➡टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा

➡अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक

➡शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात

➡बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा

➡खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण

➡खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण

➡बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा

➡उपाहारगृहांमधून घरपोच सेवा

➡औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, चारा निर्मिती घटक इत्यादी

➡रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक

➡पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज, त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था

➡टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा

➡पावसाळ्यापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे

➡अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था

➡अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणाऱ्या खासगी आस्थापना.

➡वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी

➡वरील सर्व निर्बंध लोकांच्या वाहतुकीवर, वस्तूंच्या दळण-वळणावर नाहीत.

➡अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था, संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक.