महिला अत्याचारविरोधी नवीन कायद्यात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’बाबत कडक शिक्षेची तरतूद करणार - गृहमंत्री अनिल देशमुख



मुंबई 11 मार्च : चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधातील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचाही (चाईल्ड पोर्नोग्राफी) समावेश करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधातील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून आतापर्यंत 125 गुन्ह्यांमध्ये 40 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.