भारतीय जैन संघटना चंद्रपुर च्या वतीने लॉकडाउन मध्ये 58 यूनिट रक्तदान

 
लोकतंत्र की आवाज़ ,चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क
चंद्रपुर , 11 अप्रैल : भारतीय जैन संघटना ,चंद्रपुर च्या वतीने  रक्तदान शिबिर चे आयोजन राजीव गांधी कामगार हॉल मध्ये घेण्यात आले .रक्तदान करून कोरोनाला मात करू कोरोनाच्या पाश्चर्वभूमीवर रक्तदान साठा कमी होऊ नये याकरिता रक्तदान करावे - असे आव्हान भारतीय जैन संघटना चे संस्थापाक अध्यक्ष शांतिलाल जी मुथा यांनी केले आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोना (कोविड  - १९) विषाणूच्या प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे रक्तदात्यांची संख्येत कमी होत चालली आहे. हि बाब लक्षात घेतली व पूर्ण महाराष्टतिल जैन संघटना चे पदाधिकारी यांना रक्तदान करण्यास जनतेला आवाहन केले होते. त्याअनुषंगाने  दिनांक 4 एप्रिल, 2020 रोजी राजीव गांधी कामगार भवन मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर  घेण्यात आले .

रक्तदान श्रेष्ठदान आहे त्याअनुषंगाने  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव देशात सुरु असल्यामुळे रक्तदात्यांच्या मनात हि भीतीचे वातावरण सुरु आहे. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्येत कमी होत आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये या करीता  शान्तिलाल जी मुथा ,पुणे यांनी रक्तदान उपक्रमाची सुरुवात केली. संपूर्ण देशावर कोरोना हे संकट आलेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी  हा उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम आहे. प्रत्येक शहरात सिकलसेन व इतर रुग्णांना रक्ताची खूप आवश्यकता असते अश्या वेळेत रक्तदान करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून आपण रक्तदानाच्या मार्फत त्यांचे जीव वाचविण्यास मदत करू शकतो. रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत तैयार होत नाही. रक्त फक्त माणसाने माणसाला देऊ शकतो, माणुसकीचा उपक्रम हा सर्वात श्रेष्ठ रक्तदान हा उपक्रम आहे. लॉक डाऊन  मध्ये पन संघटने चे 58 सदस्यनी रक्तदान केले . या बद्दल दीपक पारख , अमर गांधी, महेंद्र मंडलेचा ,गौतम कोठारी, प्रशांत बैद, रोहित पुगलीया, अनिल बोथरा, अड.इंदर पुगलीया, गौतम भंडारी, निलेश पुगलीया, राजेश डागा ,जितेंद्र मेहर ,दीपेन्द्र पारख,सिद्धांथ॔ कोठारी, राहुल कोठारी, आलेख गांधी, प्रतीक कोठारी आदी ने परिश्रम किया। जैन समाज के संदीप बाठीया, राहुलबाबू पुगलीया, जितेन्द्र जोगड  रक्तदान साठी  प्रोत्साहित केले .अशी बातमी  शहर सचिव आनंद तालेरा नी दिली आहे.

यांनी सर्वांचे  अभिनंदन करून सर्व रक्तदाता ला धन्यवाद केले. तरी  जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर ची पूर्ण टीम उपस्थित होती.