घनसावंगी मतदारसंघात पालक मंत्री राजेश टोपे यांच्यावतीने 6 हजार सॅनिटायझर,15 हजार मास्क,3 हजार पुस्तिका व 5 हजार माहिती पुस्तिकांचे वितरण




  जालना, दि.18 एप्रिल : संपुर्ण जगभरात कोरोना विषाणुमुळे लाखो नागरिक बाधित झाले आहेत.  जालना जिल्ह्यात या विषाणुची लागण झालेला केवळ एक रुग्ण आहे.  या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात असुन जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य विषयक सोयी-सुविधा पुरविण्याबरोबर घनसावंगी मतदारसंघातील 298 गावे-वाड्या व तांड्यावर 6 हजार सॅनिटायझरच्या बॉटल, 15 हजार मास्क, 3 हजार माहिती पुस्तिका व पाच हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. 
  जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडे या साहित्याचे वाटप करण्यात येत असून गावांत आरोग्य विषयक सर्वे करणाऱ्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस,आरोग्य सेवक,नर्स , ग्राम पंचायतचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना या साहित्याचे वाटप होणार आहे.  गाव पातळीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी मुद्द्यांमहून हे सर्व साहित्य प्रत्येक गावात पाठविण्याची व्यवस्था केली आहे.  
 कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी  जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच मतदारसंघातील प्रत्येकाला यापुढेही कुठल्याही बाबीची कमतरता भासु दिली जाणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.