माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी 6 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी चे धनादेश जिल्हाधिकारी ला दिले.

)

मदतीचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

चंद्रपूर, दि.03 एप्रिल (जिमाका) : राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रित, गरजू, लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे. यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मदत केली आहे.

चंद्रपूरचे माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी रुपये 2 लक्ष चा धनादेश, दि एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी चंद्रपुर यांच्याकडून रुपये 1 लक्षचा धनादेश, व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट चंद्रपूर व बल्लारपूर यांच्या तर्फे रुपये 1 लक्षचा धनादेश, बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्टकडुन 2 लक्षचा धनादेश असे एकूण 6 लक्ष रुपयाचा धनादेश राहुलबाबू पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना  देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली.