बदनापुर मध्ये बांधकाम कामगार मजूरांना सरकारने आर्थिक भत्ता ,निशुल्क राशन उपलब्ध करून द्यावे : बांधकाम मजदूरांची मागणी


लोकतंत्र की आवाज़ , चंद्रपुर ,न्यूज़ नेटवर्क
जालना /बदनापुर 5 अप्रैल (प्रतिनिधी ): शहरासहित तालुक्यातील सर्व बांधकामे बंद झाल्यामुळे बांधकाम कामगारावर मजुरावर उपासमारीचे वेळ .
प्रशासन लक्ष देईना
कोरोना वायरसमुळे उदभवलेल्या परिस्थिती व २१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सर्व बांधकामे बंद पडलेले आहे. त्यामुळे शहरासहित तालुक्यातील बांधकाम कामगारावर मजुरावर उपासमारीची वेळ आली असुन नोंदणीकृत , बिगर नोंदणीकृत बांधकाम कामगार मजूरांना सरकारने आर्थिक भत्ता ,निशुल्क राशन उपलब्ध करून द्यावे 
अशी मागनी बांधकाम कामगार मजुराकडून होत आहे.
सध्या जगभरात कोरोना वायरसने थैमान  घातले आसुन  कोरोना वायरसच्‍या भितीने भारतातील सर्व कामकाज ठप्प आहे. सर्व कामगाज बंद असल्याने बांधकामे बंद आहेत.त्यामुळे हातावर पोट भरणारे बांधकाम कामगार मजूर हे देखील उपासमारीचे शिकार झालेले आहेत . एकीकडे कोरोना सारख्या वायरसची व लॉकडाऊन ची भिती तर दुसरी कडे  कूटूंबाची होणारी उपासमार.या विवंचनेत एकीकडे आड तर एकीकडे विहिर अशीच काहीशी परिस्थिती बांधकाम कामगार मजूराची झालेली आहे.सदर बांधकाम कामगार मजूर हे रोज काम करून आपला उदरनिर्वाह चालवित असल्याने त्याची रोजची कमाई बंद असल्याकारणाने मजूर व त्याच्या घरातील लहाण थोरांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.तरी भारत सरकारने तात्काळ सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक भत्ता म्हणुन त्‍याच्या खात्यावर भारत सरकारने मदत जमा करावी. व राज्य सरकारने प्रती युनिट पाच किलो राशन व मास्क ,सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे
तसेच बदनापुर - अंबड विधानसभाचे  आमदार  नारायण कुचे यांनी ही नोंदित व बिगर नोंदित बांधकाम कामगारार्‍याच्या कुंटूबांची होणाऱ्या उपासमारी कडे लक्ष देऊन त्याच्या कुंटूबाला  एका हफ्त्याचे राशन  उपलब्ध करून देण्यात यावे.
अशी मागाणी नोंदित व बिगर नोंदित बांधकाम कामगाराकडून होत आहे.
၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊
               प्रतिक्रिया
सध्या कोरोना या रोगाने थैमान घातलेले असुन त्या पार्श्वभुमी वर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे सर्व कामे टप्प झालेली आहे त्यातच बांधकामेही बंद पडलेली आहे. रोज  हातावर पोट भरणाऱ्या बांधकामगाराच्या कुंटूबावर उपासमारी वेळ आली आहे. या बांधकाम कामगाराना सरकारने अर्थिक मदत व एका हफ्त्याचे राशन तात्काळ  बांधकामगाराना उपल्बध करून द्यावे.

रविराज वाहूळे (वंचित बहुजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष बदनापुर)

၊၊၊၊ .၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊    प्रतिक्रिया
कोरोना व लॉकडाऊन मुळे सर्व बांधकामे बंद पडले.  आम्ही रोज हातावर काम करतो मात्र आम्हा बांधकामगाराना काम नसल्यामुळे आमच्या कुंटूबावर उपासमारीची वेळ आली असुन शासनाने व आमदार नारायण कुचे यांनी आम्हा बांधकाम कामगाराना अर्थिक मदत करावी . व एका हफ्त्याचे राशन उपल्बध करून द्यावे.

मुनिरखाँ (मेजर) पठाण
बांधकामगार मजुर  बदनापुर
၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊
             प्रतिक्रिया
मी. बांधकामासाठी कामावर  जात होते परंतु कोरोना आणि लॉकडाऊन सर्व बाधकामे बंद  असुन आमच्या कुटुंबावर  उपासमारीची वेळ आली असुन शासनाने अम्हा लोकांना अर्थिक मदत व राशन देण्यात यावे.

श्रीमती : उज्जवला बोर्डे
बांधकाम कामगार लेबर बदनापुर
၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊၊ 
             प्रतिक्रिया
कोरोना व लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व बांधकामे बंद पडलेले असुन बांधकाम कामगार मजुरावर व त्याच्या कुंटूबावर उपासमारी मुळे हाल होत आहे. त्याच्या कुंटूबाला शासनाच्या व आजी माजी आमदारानी मदत व एका हफत्‍याचे राशन उपल्बध करून द्यावे.
शेख अनिस (राज) बांधकामगार मंजुर बदनापुर