बदनापूर नगर पंचायतने रूग्ण्वाहिका आणून रूग्णसेवा देण्याची मागणी : आरोग्य सभापती संतोष पवार


लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क
जालना /बदनापूर 13, अप्रैल (प्रतिनिधी) : येथील ग्रामीण रूग्णालयात कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे सर्वसाधारण आजारपणावर उपचार करण्यासाठी रूग्णांना वारंवार चकरा माराव्या लागत असतानाच हे ग्रामीण रूग्णालय बदनापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे नगरपंचायतने गावातील रुग्णांसाठी रूग्ण्वाहिका उपलब्ध करून दयावी अशी मागणी आरोग्य सभापती संतोष पवार यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे केली आहे.

बदनापूर येथे ग्रामीण रूग्णालय असून या ठिकाणी वैद्यकीय अधिक्षक हे पद रिक्त असल्यामुळे त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. ओम ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त्त कार्यभार होता तसेच तीन वैद्यकीय अधिकाऱ्यापैकी एक जागा रिक्त होती त्यातच जालना येथे कोरोना रूग्णालयाची नुकतीच स्थापना करण्यात आल्यानंतर येथे डॉ. ढाकणे यांना प्रतिनियुक्तीवर कोरोना रूग्णालयात नियुक्ती देण्यात आल्यामुळे या ग्रामीण रूग्णालयाचा भार फक्त एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर येऊन पडल्यामुळे येथील रूग्ण सेवा ढेपाळली आहे. त्यातच हे रूग्णालय बदनापूर पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. सध्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे या भागातील वाहने बंद आहेत. त्यामुळे बदनापूरपासून ग्रामीण रूग्णालयापर्यंत जाण्यासाठी वाहने नसल्यामुळे कित्येकदा रूगणांना हे अंतर पायी पार पाडावे लागत असल्यामुळे नगर पंचायतने रूग्ण्वाहिका आणून रूग्णसेवा देण्याची मागणी नगर पंचायतचे आरोग्य सभापती संतोष पवार यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे केली असून या ग्रामीण रूग्णालयात तीन्ही वैद्यकीय अधिकाऱ्याबरोबर वैद्यकीय अधीक्षकांची जागा भरून आरोग्य सेवा सुधारण्याची मागणीही केली आहे.