कोरोना लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना दिलासा : बदनापुर तालुका कृषी अधिकारी ठक्के

कोरोना लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना दिलासा. तालुका कृषी अधिकारी ठक्के                   
जालना / बदनापूर 16 अप्रैल  (प्रतिनिधी ) :  सध्या सर्वत्र जगभर कोरोनाच्या संचारबंदी , लाॕकडाऊन  मूळे सर्वच परेशान आहेत,अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित केलेला माल विक्री करण्यास अनंत अडचणी येत आहेत,लॉकडाऊन मूळे फळे ,भाजीपाला, दूध ईत्यादी विक्री व वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत ,परिणामी सोन्यासारखा माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असती,हा धोका ओळखून, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  शिंदे ,उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे  यांनी वेळीच उपाय योजना करून सर्व शेतकऱ्यांचा उत्पादित माल व भाजीपाला याची क्षेत्रिय कर्मचारी व आत्मा यांच्या मार्फत नोंदणी करून गटा मार्फत शहरा मध्ये विक्री करण्याची व्यवस्था केली,तशेच जे शेतकरी त्यांच्या भाजीपाला , द्राक्षे, फळे ईत्यादी   जिल्ह्यात , जिल्ह्याबाहेर व परराज्यात विक्री करतील त्यांना  परवानगी दिली.
अश्या बिकट परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांचे होनारे नुकसान कमी झाले,तसेच लोकांना ताजा भाजीपाला व फळे मिळू लागली, त्यामुळे शहरी भागातील लोक घराबाहेर न पडता,त्याना घरपोच सर्व जीवनावश्यक वस्तू मिळू लागल्या व शेतकऱ्यांना पण उत्पादित मालाचे पैसे मिळण्यास हातभार लागला
ज्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या माल विक्री करायचा असेल त्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यलयात अर्ज करावा म्हणजे त्यांना लगेच परवानगी देता येईल असे आव्हान व्हि एस ठक्के तालुका  कृषी अधिकारी बदनापूर यांनी केले आहे.
या वेळी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन करून शेतकऱ्यांना मदत केली .