महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय - राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या रिक्त दोन जागांपैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस


लोकतंत्र की आवाज चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क,
मुंबई ,09 अप्रैल : आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत  राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती असून राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या रिक्त दोन जागांपैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा बैठकीत निर्णय.

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे, या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय. पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. 

दुसरी समिती ही मंत्रिमंडळ सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री  जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अनिल परब यांचा समावेश असेल. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात  या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होणार,  कुठलाही समारोह किंवा परेड होणार नाही –मंत्रिमंडळाचा निर्णय. 

लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देण्याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांनी केल्या महत्त्वपूर्ण सूचना. या सूचनांची  काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय