पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उद्या देशाला संबोधीत करणार, ‘रेड-ऑरेंज-ग्रीन’ झोननुसार लॉकडाऊन ची नवीन घोषणा करू शकतात ? सर्वांच्या मनात उत्सुकता नवीन काय बोलणार ?


लोकतंत्र की आवाज़ , चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क

नई दिल्ली , 13 अप्रैल (प्रतिनिधि) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. 14 अप्रैल) म्हणजेच मंगळवारी सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत असे वृत माननीय पंतप्रधान यानी सोशल मीडिया ट्वीटर वर दिले आहे. दरम्यान, कोरोना वायरस संक्रमण जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत उद्या म्हणजेच 14 एप्रिलला संपत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार असून ते लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा, ओडिशा आणि दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर 5 राज्यातील मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशातील लॉकडाऊन वाढविण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, देशातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन केले आहेत.  जानकाराकडूंन त्यामध्ये किमान रेड आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन कमी जास्त करण्याची दाट  शक्यता वर्तविली जात आहे. रेड झोन मध्ये कोरोना चे 15 पेक्ष्या जास्त रुग्ण, ऑरेंज झोन मध्ये कोरोना चे 15 पेक्ष्या कमी रुग्ण, आणि ग्रीन झोन मध्ये ते जिल्हे ज्या मध्ये एकपन कोरोना रुग्ण नाही. पूर्ण देशात 21 दिवसाचा लॉकडाउन हा निर्णय कोरोना या महामारी साठी फार उपयोगी ठरला .