चंद्रपुर जिल्हा परिषद अध्यक्षा कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावावर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागणीचे निवेदन आणि चर्चा


चंद्रपुर, 01 एप्रिल (का. प्र.) : जिल्हा परिषद ,चंद्रपुर अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार साहेब यांची भेट घेतली. 
याप्रसंगी त्यांनी कोरोणा वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आरोग्य यंत्रणा व इतर शासकीय सेवेतील कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने व जागरुकता आणण्याच्या दृष्टीने यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात यावी. तसेच जागतिक महामारी कोरोणा ( Covid-19) या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता शासनस्तरावरून ०१ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावे. अश्या विषयाचे निवेदन मा. जिल्हाधिकार्‍यांना दिले.
तसेच कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावावर खबरदारी घेण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.