चंद्रपूर ,दि 10 मई (का प्र): महाराष्ट्र राज्यातील ग्रामिण व निमशहरी भागातील अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांवर लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकट कोसळले असुन त्यांना सन्मानाने उपजिवीका करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येकी 5000 रूपयाचे आर्थिक सहाय्य व बि.पी.एल कार्डधारकाप्रमाणे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे अशाी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शिंपी, सुतार, लोहार, चर्मकार, विनकर, कुंभार, न्हावी, परीट व अन्य सर्व पारंपारीक कारागीर यांना बारा बलुतेदार अशी ओळख असुन हा सर्व समाज कुशल कारागीर सज्ञेत मोडतो. कोरोना विषाणुच्या संक्रमणापासुन नियंत्रनासाठी सरकारने लागु केलेल्या लाॅकडाऊनमुळे बारा बलुतेदारांचे पारंपारीक व्यवसाय दिर्घकाळ बंद असल्याने त्यांच्यासमोर परिवाराचे पालन पोषण करण्याचे मोठे संकट उभे ठाकले असल्याचे निदर्शनास आणुन देत या बारा बलुतेदारांना सन्मानाने जगण्यासाठी शासनाने मदत करण्याची गरज असल्याचे अहीर यांनी सांगीतले. सरकार सध्या बि.पी.एल कार्डधारकांना मोफत धान्य पुरवित आहे याच धर्तीवर बारा बलुतेदारांना धान्य वाटप करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्याची सुचनाही अहीर यांनी केली.