ऑक्शन एड संस्थेमार्फत गावातील आशा वर्कर्स ,अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांना सॅनिटायझर, हाॅड ग्लोज, माॅस्क व संतुर साबन यांचे वाटप


       जालना/बदनापुर ,29 मई : जगभरात  कोरोना व्हायरस-  कोवीड 19 हा धोकादायक आजार खुप वेगाने वाढत आहे.  यातून संपुर्ण  देशामध्ये  लाॅकडाउन जाहिर केल्यामुळे शहरातील लोक गावाकडे आले आहेत. कोरोना व्हायरस यांचे  शहरामध्ये रूग्णाचे प्रमाण वाढले आहे.  कामानिमित्त  शहरात गेलेले मजुर गावात परत  आले आहेत. यामुळे गावामध्ये कोरोना याचे संकट येण्यची  शक्यता आहे.  गावामध्ये गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे.  यासाठी गावातील सर्व कुटुंबांना आपल्या  आरोग्याची स्वच्छता ठेवण्यासाठी प्रत्येकी कुटूंब 20 संतुर साबन व  गावातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी गावातील व्यक्तीच्या घरोघरी जाऊन सर्वाच्या आरोग्याची काळजी घेतात. कोरोना कोवीड या आजारापासुन स्वताचे व इतरांचे आरोग्य सुरक्षित राहवे. यासाठी   अॅक्शन एड  संस्थे मार्फत  बदनापुर तालुक्यातील 10 व औरंगाबाद जिल्ह्यातील 5 गावामध्ये संस्था  ग्राम विकासाचे कार्य करते . संस्थांमार्फत या गावामध्ये आशा ताई, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांना संस्थांमार्फत सॅनिटायझर, माॅस्क, हाॅड ग्लोज व संतुर साबन  याचे वाटप करण्यात आले. 

      या साठी अॅक्शन एड संस्थेचे प्रकल्प अधिकारी सूर्यकांत गवळे, प्रकल्प  समन्वयक शिरीष जाधव, गब्बरसिंग बहुरे, संदिप शिंदे, भागवत वाघमारे,  विशाल जारवाल यांनी परीश्रम करून  आरोग्य रक्षक साहित्याचे वाटप केले.