सागरवाडी ता. बदनापूर येथे शेकडो शेतकऱ्यांचे पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज दाखललोकतंत्र की आवाज़,चंद्रपूर
जालना/बदनापुर/सागरवाडी ,22 मई (प्रतिनिधि) :
बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे दिनांक 21 व 22 मे या दोन दिवसात शेकडो शेतकऱ्यांनी पीक कर्ज मागणी साठी केले ऑनलाईन अर्ज. जागतिक महामारी मुळे कोविड 19 विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देश पातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा च्या अनुषांगाने कोविड 19 या आजाराचा प्रसार होऊ नये व शेकरींचे बँकेत  होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी रवींद्र बिंनवडे यांनी 19 मे रोजी ज्या शेतकरीना पीक कर्ज हवे असेल त्यांनी 20 मे ते 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे असे आदेश दिले आहे. त्या आदेशा नुसार सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल यांनी गावातील सर्व शेतकरी चे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संचार बंदीचा पालन करून गावातच ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सेवा देण्याचे निर्णय घेतला आहे.. त्या नुसार त्यांनी 21 व 22 मे या दोन दिवसात शेकडो शेतकरी चे ऑनलाईन अर्ज केले आहे..