बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे पाऊस व वादळी वाऱ्यामुळे लाईट खंबे तुटून पडले

जालना/बदनापुर/सागरवाडी, 31 मई :
बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे आज 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने इंदलसिंग मोहन बहूरे व विजयसिंग शिवसिंग बहूरे यांच्या शेतातील थ्री फ्यूज लाईट चे 3 खांबे तुटून खाली पडले व तसेच लाईन चे तार पडल्याने डीपी धक्का बसला या धक्याने डीपी ही पडण्याची भीती जवळच्या शेतकरी मध्ये निर्माण झाली आहे. या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोणतेही जीवित हानी झाली नाही. या घटने बद्दल विशाल जारवाल यांनी महावितरण चे कर्मचारी शी फोन वर संपर्क साधला असता उद्या येऊन दुरुस्त करून घेऊ असे सांगण्यात आले.या वेळी मन्नूसिंग बहूरे, रवी बहूरे , सीताराम खोकड, विशाल जारवाल व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.