जालना/बदनापुर/सागरवाडी ,16 मई (प्रतिनिधि): आज दिनांक 16 मई रोजी सागरवाडी ता. बदनापूर येथे अवकाळी पाऊस व गारपीट मुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्यात आले.
बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे दिनांक 10/05/2020 रोजी अवकाळी पाऊस व गारपिट तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे पिकांचे तसेच घरावरील पत्रे जनावरांचे गोठे यांचे नुकसान अवकाळी पाऊस व गारपीट व वादळी वाऱ्यामुळे झाले होते. या बाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल सह गावातील नागरिकांनी नायब तहसीदार शिंदे यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती.त्या पार्शवभूमीवर गट विकास अधिकारी हरकल साहेब, कृषी सहाय्यक गणेश जाधव,तलाठी काकडे, ग्रामसेवक श्रीमती आष्टीकर यांनी पंचनामा केला.या वेळी सरपंच देवचंद बहुरे ,उपसरपंच डॉ. केसरसिंग बहुरे, माझी सरपंच अंबरसिंग बहुरे,अजय खोकड,मनुसिंग बहुरें, व इतर नागरिक उपस्थित होते.