सुप्रजा फाउंडेशन मानव संस्था व वाँटर संस्थेचे वतीने सीमेंट बंधारातील गाळ काढण्या चे काम शुरूलोकतंत्र की आवाज,चंद्रपूर न्यूज़ नेेेटवर्क

जालना /बदनापुर/ किन्होळा ,5 मई : मानव ग्रामीण विकास व संशोधन संस्था मार्फत सुप्रजा फाउंडेशन अर्थसहाय्यीत व वाँटर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मौजे किन्होळा या गावामध्ये सिमेंट बंधारातील गाळ मजुरांच्या सहाय्याने काढण्याचे कामाचे उदघाटन किन्होळा येथील ग्रामपंचायत सदस्य मुकतार गुलाब बेग  
कल्याण भुजंग पाणलोट समिती अध्यक्ष नामदेव धोडींबा भुजंग डावरगाव चे उपसरपंच नब्बूखाँ पठाण रमेश खरात चंद्रकांत सोनवणे दिपक ठाकुर आशा सेविका सुमित्रा गवारे नुरखाँ पठाण सागरवाडी चे सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल यांच्या उपस्थितीत सुरू झाले.
गावातील भूमिहीन कुटुंब व शेतमजूर यांना या कामामुळे गावातच रोजगार उपलब्ध झाला.सदरील कामावर मजूर स्वखुशीने आले तसेच कामावर मास्क व स्वच्छतेसाठी साबण याचा वापर करणार आहे.तसेच कामाचे नियम व अटी तसेच कामावर सामाजिक अंतर याचे पालन करणार आहे.
सर्व ग्रामस्थ व शेतमजूर यांनी सुप्रजा फाउंडेशनने अत्यंत अडचणीच्या वेळेस काम सुरू करून गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल सुप्रजा फाउंडेशन मानव संस्था व वाँटर संस्थेचे आभार व्यक्त केले.