स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या जयंतीनिमीत्‍त आ. सुधीर मुनगंटीवार यांचे नमनलोकतंत्र की आवाज़, चंद्रपूर
चंद्रपूर ,28 मई (का प्र) :  स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्‍या 137 व्‍या जयंतीदिनानिमीत्‍त महाराष्‍ट्राचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या प्रतिमेला मालार्पण करून त्‍यांना नमन केले.

स्‍वातंत्र्यलढयातील एका क्रांतीकारक चळवळीचे धुरीण, स्‍वातंत्र्यपूर्व आणि स्‍वातंत्र्योत्‍तर भारतीय राजकारणातील महत्‍वाचे राजकारणी तसेच हिंदु संघटक व हिंदुत्‍वाचे एक विशिष्‍ट तत्‍वज्ञान मांडणारे एक तत्‍वज्ञ, विज्ञानाचा पुरस्‍कार व जातीभेदाला तिव्र विरोध करणारे समाज क्रांतीकारक, भाषाशुध्‍दी व लिपिशुध्‍दी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्‍यीक आणि प्रचारक असे बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍वाचे धनी असलेले स्‍वातंत्र्यवीर सावरकर हे आमचा मानबिंदू आहे. सावरकर माने तेज, सावरकर माने त्‍याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्‍व अशा शब्‍दात श्रध्‍देय अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्‍या कवितेतुन सावरकरांचे वर्णन केले आहे. अशा या प्रखर राष्‍ट्रभक्‍ताला आपण नमन करीत असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, उपमहापौर राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, खेमराज दिवसे, कुणाल शेंडे, दत्‍तप्रसन्‍न महादाणी, अनिल वनकर, आदींची उपस्थिती होती.