आपल्या जिल्ह्यातील रक्तसाठा आपल्याच रुग्णाला मिळण्याकरिता चंद्रपुरात अत्याधुनिक ब्लड बँक उभारणार -खासदार बाळू धानोरकर


   चंद्रपुर ,11 जून : कोरोनाच्या संकटात देखील आर्थिक व इतर मदत मोठ्या प्रमाणात केल्या गेल्याचे  दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात येत आहे. परंतु रक्त साठविण्याची व्यवस्था मर्यादित असल्यामुळे नागपूर किंवा वर्धा येथील टीमला पाचारन करून जिल्ह्यातील रक्तसाठा तिथे नेण्यात येते. त्यामुळे  आपल्या जिल्ह्यातील लोकांना या रक्ताचा फायदा मिळत नसून खाजगी रुग्णालयातून रक्त घ्यावे लागते. त्यामुळे पुढे आपल्या जिल्ह्यातील रक्तसाठा आपल्याच रुग्णाला मिळण्याकरिता जिल्ह्यात अत्याधुनिक ब्लड बँक उभारणार असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

    महाआघाडी तर्फे ऊर्जानगर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे नेते 
विनोद दत्तात्रय, रामू तिवारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकार, अभिजित खंनाडे, लोकेश कोटरंगे, चेतन गाडगे, अभय मस्के, उत्तम रोकडे, प्रदीप ढाले, पंकज ढेंगाडे, सौरभ घोरपडे, शुभम आंबोरकर यांची उपस्थिती होती.