चंद्रपुर जिल्ह्यात विवाहाकरिता पाच लोकांच्या मर्यादेत बँड पथक उपस्थित ठेवता येणार , विवाह परवानगी देण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अधिकारचंद्रपूरदि.12 जुन: चंद्रपूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. 

त्याचप्रमाणेया आदेशानुसार विवाह करिता परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून विवाह करिता 50 व्यक्ती तर पाच लोकांच्या मर्यादित बँड पथक उपस्थित ठेवता येणार आहे.

कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विवाहाकरिता 50 व्यक्तींच्या उपस्थितीत शासनाकडे यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून विवाहाकरिता परवानगी आहे.

तसेचपाच लोकांच्या कमाल मर्यादेत बँड पथक उपस्थित ठेवून विवाहाकरिता परवानगी देण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी तथा सब डिव्हिजनल इन्सिडेंट कमांडर यांना त्यांचे क्षेत्रात अधिकार असतील. 

परंतुकंटेनमेंट क्षेत्रातील व्यक्तींना विवाह करिता परवानगी देता येणार नाही.

वरील आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्तीसंस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188269270271 नुसार शिक्षेस पात्र असलेला  अपराध केला असे मानुन नियमानुसार कारवाई करण्यात येईल.