महाराष्ट्रात शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता


मुंबई 15, जुन :
ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या,

 ग्रामीण व तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करणार.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड़ यांच्या उपस्थितीत निर्णय

◆शाळा सुरु करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदि कामे केली जातील.

#रेडझोन मध्ये नसलेल्या ९ , १०वी, १२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून 

●६ वी ते ८ वी ऑगस्ट पासून 
●वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून 
●वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने 
●इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन.