महाराष्ट्र शासनाचे पाचवे मंत्री कोरोना पॉजिटिव

महाराष्ट्र शासनाचे पाचवे मंत्री कोरोना पॉजिटिव

मुंबई , दि 22 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्याचे त्यांच्या चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.  महाराष्ट्रतिल आत्तापर्यंत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सा. बां. मंत्री अशोकराव चव्हाण,  तसेच गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना वर मत केली. वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई चे पालकमंत्री असलम शेख असे आता पर्यत चार मंत्री ला कोरोना ची लागान झाली. आतापर्यत कोरोनाची बाधा झालेले अब्दुल सत्तार राज्यातील पाचवे मंत्री ठरले आहेत.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की :

थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे.  परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही. या कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असेल ; परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.

मुंबई येथील लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर साहेबांचे उपचार घेतले असून मी मुंबई येथेच होम क्वांरांटाईन आहे. माझ्या संफात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य तो उपचार घेऊन  होम क्वांरांटाईन व्हावे.आपण सर्वांनी ईश्वर,अल्लाह,भगवंताला प्रार्थना करावी.

 आहेत, त्या जोरावर लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन परत येईल.