महाराष्ट्रात आतापर्यत 138 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू #महाराष्ट्रपोलिस

महाराष्ट्रात आतापर्यत 138 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई , 23 अगस्त : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील 24 तासां मध्ये आणखी 288 पोलीस कोरोना बाधित आढळले असून, दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून एकूण 138 जणांचा बळी गेला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 13,468 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 2,478 जण, कोरोनामुक्त झालेले 10,852 जण व आता पर्यंत मृत्यू झालेल्या 138 जणांचा समावेश आहे.

राज्यातील 13,468 कोरोना बाधित पोलिसां मध्ये 1,421 अधिकारी व 12,047 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (ऍक्‍टिव्ह) 2,478 पोलिसांमध्ये 311 अधिकारी व 2,167 कर्मचारी आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 10,852 पोलिसांमध्ये अधिकारी 1,96 व 9,756 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 138 पोलिसांमध्ये 14 अधिकारी व 124 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.