चंद्रपूर जिल्ह्यात आज नवीन 203 कोरोना बाधित, जिल्ह्यात एकूण संख्या 2547 , आज 3 मृत्यु, #corona #Covid-19

चंद्रपूर,31 अगस्त :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 2547 झाली आहे. गेल्या 24 तासात 203 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1249 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

सध्या जिल्ह्यामध्ये 1271 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1249 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील 29 सह एकूण 26 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिला मृत्यु : बाबुपेठ चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 22 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. 

दुसरा मृत्यु : 45 वर्षीय ऊर्जानगर चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते . बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार होता . 30 ऑगस्टलाच सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . 

तिसरा मृत्यु : 65 वर्षीय गांधी वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 29 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 30 ऑगस्टला बाधिताचा अहवाल पॉझिटीव्ह आला उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . (गेल्या 24 तासातील है तीन मृत्यु आहेत. )