चंद्रपूर जिल्ह्यात आज 47 नवीन कोरोना बाधित रुग्ण समोर आले , एकाचा मृत्यु, एकूण 16 #Covid-19 #चंद्रपूरकोरोनाअपडेट

चंद्रपूर, दि. 24 ऑगस्ट(का प्र) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1495 झाली आहे. गेल्या 24 तासात 47 नवीन बाधित पुढे आले आहेत .

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 998 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
सध्या जिल्ह्यामध्ये 481 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 998 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यातील 14 सह एकूण 16 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 53 वर्षीय WCL कॉलोनी भद्रावतील नागरिकांचा सरकारी रुग्णालय चंद्रपूरात निधन झाले आहे.