खासदारांच्या आवाहनाला गोपनी आर्यन कंपनीची साथ, एक लाख ९० हजार रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा

खासदारांच्या आवाहनाला गोपनी आर्यन कंपनीची साथ

एक लाख ९० हजार रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा

लोकसभा क्षेत्रातील विविध विषयांवर खासदार बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याशी चर्चा

  चंद्रपूर : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात, राज्यात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. मोठं संकट सर्व नागरिकांवर कोसळल आहे. प्रत्येक माणसापर्यंत मदत पोहचविण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून समाजातील प्रत्येक माणसांनी समोर येऊन मदत करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले होते. त्या मदतीला साथ देत गोपनी आर्यन अँड पॉवर यांच्या तर्फे एक लाख ९० हजार रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली आहे. त्याबाबतचा धनादेश खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना सुपूर्त केला आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, सोहेल शेख, रमेश बुचे, संतोष बादूरकर, मोहन वाघमारे, विजय मोरे, तुळशीराम देरकर, विकास आवारी, रमेश आरपेल्ली, प्रमोद नागपुरे, नरेश वाकडे यांची उपस्थिती होती. 

त्यासोबतच खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील १३२ वर्ष जुन्या ऐतिहासिक शाळेला निधी उपलब्ध करून सौंदर्यीकरण व मॉडेल शाळा तयार करणे, कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, आशा वर्कर, सफाई कामगार यांच्या चाचण्या करणे, वरोरा येथील पशु वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थानाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. बाराज येथील कोळसा खाणीतील राखीमुळे जवळच्या वस्तीतील लोकांच्या आरोग्याच्या समस्या याविषयांवर चर्चा करण्यात आली. त्वरित या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी खासदार बाळू धानोरकर यांना दिले.