चंद्रपूर शहर व परिसरातील 149 बाधित,24 तासात 230 नवीन बाधित; 5 बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 9812 वर corona chandrapur

जिल्ह्यात आतापर्यंत 5690 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3974

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 9812 वर

24 तासात 230 नवीन बाधित; 5 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 230 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 9 हजार 812 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 690 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 974 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, लाखांदूर, भंडारा येथील 46 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू श्याम नगर, चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 22 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू बनवाही, नागभिड येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू  ब्रह्मपुरी येथील 70 वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, पाचवा मृत्यू चुनाभट्टी, राजुरा येथील 74 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या सर्व मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 148 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 139, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन,यवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 

चंद्रपूर शहर व परिसरातील 149 बाधित, 
पोंभूर्णा तालुक्यातील 2, 
बल्लारपूर तालुक्यातील 7, 
मुल तालुक्यातील 8, 
कोरपना तालुक्यातील 1, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 18, 
 वरोरा तालुक्यातील 13, 
भद्रावती तालुक्यातील 5,
 सावली तालुक्यातील 11, 
 सिंदेवाही तालुक्यातील 14, 
राजुरा तालुक्यातील 2,
असे एकूण 230 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील
 बालाजी वार्ड, 
समाधी वार्ड, 
रेल्वे कॉलनी परिसर, 
स्नेह नगर, 
सुमित्रा नगर, 
अंचलेश्वर वार्ड, 
महेश नगर, 
हॉस्पिटल वार्ड,
 जल नगर, 
घुटकाळा वार्ड, 
रयतवारी कॉलनी परिसर, 
गोपाल नगर, 
बाबुपेठ,
 तुकूम, 
ऊर्जानगर, 
दुर्गापुर ,
पठाणपुरा वार्ड, 
सिव्हिल लाईन परिसर,
 भिवापुर वॉर्ड, 
विठ्ठल मंदिर वार्ड, 
जटपुरा गेट परिसर, 
सिद्धार्थ नगर,
 संजय नगर, 
गंज वार्ड, 
ओमकार नगर 
भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, बामणी, नेहरू वार्ड, टिळक वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

राजुरा तालुक्यातील अमराई वार्ड भागातून बाधीत पुढे आले आहे. 

वरोरा तालुक्यातील सलिम नगर, टिळक वार्ड, सरदार पटेल वार्ड, मालविय वॉर्ड, मोकाशी लेआऊट परिसर, एकार्जूना, कृषी नगर, अभ्यंकर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगर, गुजरी वॉर्ड, पेठ वॉर्ड,  मेंढकी, संत रविदास चौक परिसर, शेष नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

 कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, गजानन नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

सावली तालुक्यातील  व्याहाड, चकपरंजी  भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

 सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव भागातून बाधित पुढे आले आहे.