आज गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यात नवीन 190 कोरोना बाधित, एकूण बाधित 4852 #Corona #Covid-19

चंद्रपूर,10सेप्टेंबर(का प्र) :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 4852 झाली आहे. गेल्या 24 तासात 190 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 2557 बाधितांना बरे  झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2767 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 2557 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 56 सह एकूण 52 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.