24 तासात 152 नवीन बाधित; 2 बाधिताचा मृत्यू, चंद्रपूर शहर व परिसरातील 89 बाधित, #Corona #Covid-19


जिल्ह्यात आतापर्यंत 2049 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1958,

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 4055 वर,

24 तासात 152 नवीन बाधित,

2 बाधिताचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 152 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 4055 वर गेली आहे. आतापर्यंत 2049 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 1958 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गोपालपुरी, बालाजी वार्ड चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तर, दुसरा मृत्यु हा 54 वर्षीय बिनबा वॉर्ड, चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 4 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 6 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

जिल्ह्यात मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 48 झाली असून चंद्रपूर 44, तेलंगाना एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 89 बाधित,
चिमूर तालुक्यातील 12,
पोंभुर्णा तालुक्यातील 12,
बल्लारपूर तालुक्यातील 10,
ब्रह्मपुरी तालुक्यातील 3,
भद्रावती तालुक्यातील 5,
मूल तालुक्यातील 2,
राजुरा तालुक्यातील 6,
वरोरा तालुक्यातील 6,
सावली तालुक्यातील 3,
गोंडपिपरी तालुक्यातील 2
तसेच मुंबई 1 व वणी यवतमाळ येथील 1 असे एकूण 152 बाधित पुढे आले आहेत.