24 तासात 251 बाधिताची नोंद ; 6 बाधितांचा मृत्यू,चंद्रपूर शहर व परिसरातील 101, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6309 #ChandrapurCoronaUpdate

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6309

24 तासात 251 बाधिताची नोंद ; सहा बाधितांचा मृत्यू,

चंद्रपूर शहर व परिसरातील 101, 

3538 कोरोनातून बरे ; 2687 वर उपचार सुरू

चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 251 नवीन बाधितांची नोंद झाली असून कोरोना पॉझिटिव्हची एकूण संख्या 6 हजार 309 झाली आहे. यापैकी 3 हजार 538 बाधित बरे झाले आहेत तर 2 हजार 687 जण उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसर, जटपुरा गेट चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू आरटीओ ऑफिस परिसर, चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा झालाआहे. या बाधिताला 2 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू कन्हाळगाव ब्रह्मपुरी येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यू घुटकाळा वार्ड चंद्रपूर येथील 50 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. 10 सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 14 सप्टेंबरला बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया होता.

पाचवा मृत्यू भानापेठ, चंद्रपूर येथील 69 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तर, सहावा मृत्यू गांधी वार्ड,  ब्रह्मपुरी येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. याबाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 84 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 77, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 

चंद्रपूर शहर व परिसरातील 101, 
कोरपना तालुक्यातील 1, 
गोंडपिपरी तालुक्यातील 7, 
चिमूर तालुक्यातील 8, 
नागभीड तालुक्यातील 4, 
पोंभुर्णा तालुक्यातील 9, 
बल्लारपूर तालुक्यातील 18,
 ब्रह्मपुरी तालुक्यातील 28,
 भद्रावती तालुक्यातील 6, 
मूल तालुक्यातील 7, 
राजुरा तालुक्यातील 9, 
वरोरा तालुक्यातील 15, 
सावली तालुक्यातील 20, 
सिंदेवाही तालुक्यातील 14,
 वणी -यवतमाळ  2, 
लाखांदूर-भंडारा व 
वडसा-गडचिरोली येथील प्रत्येकी 1

असे एकूण 251 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्ड, 
सुमित्रा नगर, 
पठाणपुरा वार्ड,
 दादमल वार्ड,
 बाबुपेठ वार्ड, 
ऊर्जानगर, 
कोतवाली वार्ड, 
रामनगर परिसर, 
पत्रकार नगर, 
एकोरी वार्ड, 
नगीना बाग, 
वाघोबा चौक तुकुम, 
महाकाली कॉलनी परिसर, 
संकल्प कॉलनी परिसर, 
आंबेडकर वार्ड, 
सिद्धार्थ नगर 
भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

राजुरा तालुक्यातील धोपटाळा, चुनाळा, रामनगर कॉलनी परिसर, भारत चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

बल्लारपूर तालुक्यातील गोरक्षण वार्ड, रवींद्र नगर, बुद्ध नगर, पंडित दीनदयाल वार्ड, विद्यानगर, विवेकानंद वार्ड, भगतसिंग वार्ड, नेहरू नगर भागातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातून गुजरी वार्ड, बालाजी वार्ड, विद्यानगर, जानी वार्ड, कृष्णा कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

वरोरा तालुक्यातील सुभाष वार्ड, विनायक लेआउट परिसर, माढेळी, बोर्डा, एकार्जूना परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील इंदिरानगर शंकरपूर, माणिक नगर, सोनेगाव, खडसंगी, भागातून बाधित पुढे आले आहे. 

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी, धाबा, चक घडोली परिसरातून बाधित पुढे आले आहे.