मागील 24 तासात 4 कोरोना बाधितान चा मृत्यु, एकूण मृत्यु 122 (जिल्ह्यात 115) #ChandrapurCoronaUpdate

चंद्रपूर, 22 सेप्टेंबर:
पहिला मृत्यू : सरकार नगर चंद्रपूर येथील 89 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 6 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते . 

दुसरा मृत्यू : बाबुपेठ , चंद्रपुर येथील 67 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 17 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते . 

तिसरा मृत्यू : बालाजी वार्ड , चंद्रपुर येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

चवथा मृत्यू : गांधी वार्ड , बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

( गेल्या 24 तासातील हे वरील चार मृत्यू आहेत . अनुक्रमे एक ते दोन मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह मधुमेह आजार असल्याने क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . तर तिसऱ्या व चवथ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )

आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 122 ( चंद्रपूर 115 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 )