आज मंगलवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना ने 3 बधितानचा मृत्यु #Corona

आज मंगलवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना ने 3 बधितानचा मृत्यु

चंद्रपूर, 08 सेप्टेंबर (का प्र) :

पहिला मृत्यु : नेरी तालुका चिमूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 दुसरा मृत्यु : गांधी चौक , गोंडपिपरी येथील 41 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 4 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .7 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता .

 तिसरा मृत्युः माजरी , भद्रावती येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे .7 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .7 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता . 
( गेल्या 24 तासातील हे तीन मृत्यु आहेत )