चंद्रपूर जिल्ह्यात आज 315 नवीन कोरोना बाधित , एकूण कोरोना बाधित संख्या 5568, एकूण मृत्यु 60 #CoronaChandrapurUpdate

चंद्रपूर,12 सेप्टेंबर(का प्र) :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 5568 झाली आहे. गेल्या 24 तासात 315 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 3086  बाधितांना बरे  झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2416 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 3086 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 60 सह एकूण 54  कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.