आज रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात 5 कोरोना बाधितनचा मृत्यु , एकूण संख्या 71 (चंद्रपूर जिल्ह्यात 64) #CoronaChandrapurUpdate

चंद्रपूर,13 सेप्टेंबर (का प्र):
पहिला मृत्युः शिवाजी नगर , खेड ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

दुसरा मृत्युः बामणवाडा राजुरा येथील 52 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 तिसरा मृत्युः नगीना बाग , चंद्रपुर येथील 37 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 4 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

चवथा मृत्यु : वणी यवतमाळ येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 7 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 12 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता . 

पाचवा मृत्यु : बिकली नागभिड येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनिया , हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 ( गेल्या 24 तासातील हे पाच मृत्यु आहेत ) 

आता पर्यन्त एकूण मृत्यु 71 ( चंद्रपूर 64 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ) आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित.